एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी 915 (LIC Jeevan Anand policy)
एलआयसीच्या (LIC) अनेक पॉलिसी बाजारात आहेत. मात्र एलआयसीची एक अशी पॉलिसी आहे ज्यामध्ये मिळणारे फायदे खास आहेत. या पॉलिसी पीरियडच्या शेवटी मॅच्युरिटीचा लाभ मिळतो आणि आयुष्यभरासाठी सम अश्युअर्डचे विमा संरक्षण टर्म इन्श्युरन्सप्रमाणे मिळते. अशावेळी ज्यांना वाटते की मॅच्युरिटीच्या वेळेस लाभ मिळावेत आणि त्यांच्या मृत्यूनंतरदेखील नॉमिनीला लाभ मिळावा तर ही पॉलिसी अशांसाठी उत्तम पर्याय आहे. एलआयसीची एक जबरदस्त पॉलिसी आहे. या पॉलिसीचे नाव आहे जीवन आनंद पॉलिसी (Jeevan Anand policy). आर्थिक नियोजनासाठी आयुर्विमा (Life Insurance)घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. (LIC Jeevan Anand policy gives Rs 25 Lakh on
1,400 premium)
एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी (LIC Jeevan Anand
policy)
एलआयसीच्या या पॉलिसीचा टेबल क्रमांक म्हणजे एलआयसीमधील पॉलिसी क्रमांक ९१५ आहे. या पॉलिसीमध्ये प्रिमियम टर्म आणि पॉलिसी टर्म समान आहेत. म्हणजेच जितक्या वर्षांची पॉलिसी असेल तितक्या वर्षांसाठी प्रिमियम भरावा लागेल. या पॉलिसीसाठी वयाची पात्रता, किमान १८ वर्षे आणि कमाल ५० वर्षे आहे. कमाल मॅच्युरिटीचे वय ७५ वर्षे आहे. पॉलिसीचा कालावधी १५ वर्षांपासून ३५ वर्षांपर्यतचा आहे. पॉलिसीचा कालावधी असेल तितकाच प्रिमियमचा कालावधी असणार आहे.
किमान सम अश्युअर्ड १ लाख रुपये
सम अश्युअर्डबद्दल सांगायचे तर या पॉलिसीत किमान सम अश्युअर्ड १ लाख रुपये आहे तर त्याहून अधिक त्यापेक्षा ५,००० च्या पटीत असणार आहे. कमाल सम अश्युअर्डची कोणतीही मर्यादा नाही.
या पॉलिसीबरोबर चार रायडर सुविधादेखील मिळतात. हे रायडर आहेत-अॅक्सिडेन्टल डेथ अॅंड डिसएबिलिटी रायडर, अॅक्सिडेंट बेनिफिट रायडर, न्यू टर्म इन्श्युरन्स रायडर आणि न्यू क्रिटिकल इलनेस बेनिफिट रायडर.
दोन प्रकारच्या बोनसचा मिळतो लाभ
या पॉलिसीसोबत दोन प्रकारच्या बोनसचा लाभ मिळतो. पॉलिसी जितकी जुनी असेल तितका वेस्टेड सिंपल रिव्हिजनरी बोनसचा लाभ जास्त मिळेल. फायनल अॅडिशनल बोनसचा लाभ घेण्यासाठी पॉलिसी १५ वर्षे जुनी असणे गरजेचे आहे. डेथ बेनिफिटसंदर्भात जर पॉलिसीच्या कालावधीदरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर सम अश्युअर्डच्या १२५ टक्के डेथ बेनिफिट मिळतो. मॅच्युरिटीच्या वेळेस सम अश्युअर्ड बोनससोबत मिळतो. त्यानंतर जेव्हा पॉलिसीधारकाचा मृत्यू होईल तेव्हा त्याच्या कुटुंबाला सम अश्युअर्डइतकी रक्कम पुन्हा मिळेल. ही पॉलिसी घेतल्यानंतर दोन वर्षांनी कर्जाची सुविधा उपलब्ध होते.
मॅच्युरिटीच्या वेळेस मिळणारा लाभ
समजा जर सुरेशचे वय ३५ वर्षे आहे आणि त्याने ५ लाखांचा सम अश्युअर्ड घेतला आहे आणि पॉलिसी ३५ वर्षांची आहे. तर एलआयसीच्या प्रिमियम कॅल्क्युलेटरनुसार त्याचा वार्षिक प्रिमियम १६,३०० रुपये असेल. सहामाही प्रिमिय ८,२०० रुपये, तिमाही प्रिमियम ४,२०० रुपये आणि दरमहा प्रिमियम १,४०० रुपये असेल. ३५ वर्षांमध्ये त्याची एकूण जमा रक्कम ५.७० लाख रुपये असेल. सध्या एलआयसीने ज्या दराने बोनस जाहीर केला आहे त्या दराने सुरेशला मॅच्युरिटीच्या वेळेस एकूण २५ लाख रुपये मिळतील. यामध्ये बेसिक सम अश्युअर्ड ५ लाख, ८.६० लाख रुपये वेस्टेड सिंपल रिव्हिजनरी बोनस आणि ११.५० लाख रुपये फायनल अॅडिशनल बोनस असेल. जेव्हा सुरेशचा मृत्यू होईल तेव्हा त्याच्या नॉमिनीला ५ लाख रुपये पुन्हा मिळतील.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा